स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती तुळजापुरात साजरी

सावरकरांची देशभक्ती नव्या पिढीसाठी मार्गदर्शक –  बाळासाहेब शामराज 

तुळजापूर दिनांक 28 पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य आजही लोकांसमोर आहे त्यांची देशभक्ती नव्या पिढीसाठी मार्गदर्शक अशी आहे सावरकरांचा जीवनपट म्हणजे एक धगधगता इतिहास आहे असे शब्दात सावरकर विचारबंच अध्यक्ष बाळासाहेब शामराज यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती सावरकर विचार मंचाच्या वतीने व समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सावरकर चौकामध्ये सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुनील जाधव व ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी सनातन संस्थेचे साधक अमित कदम यांनी सावरकरावरती आपले प्रखर विचार मांडले या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा अशी सावरकराची कल्पना आता वास्तव्यामध्ये येणार सावरकरांचा इतिहास काँग्रेसवाल्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला पण सावरकर यांचा इतिहास दडपणार नाही तो अजून प्रकाशात येईल असे अमित कदम यांनी सांगितले.

 यावेळी सावरकर विचार मंचाचे कार्यवाह महेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज सावरकर विचार मंचाची उपाध्यक्ष उमेश गवते सनातन संस्थेचे उमेश कदम संस्कार भारतीचे अण्णा महामुनी रा स्व  संघाचे शहाजी जगदाळे, राजू भोसले भाजपाचे गुलचंद व्यवहारे., शिवाजीराव डावकरे आप्पा रसाळ,.दिनेश बागल. राम चोपदार  शिवसेना नेते श्याम पवार ,सुहास साळुंखे, गिरीश देवलालकर, ज्येष्ठ विधीज्ञ गिरीश लोहारेकर हेमंत कांबळे संतोष पाठक युवा नेते आबा रोचकरी पत्रकार एटी पोपळे आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते. तुळजापूर येथील सावरकर चौक येथे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी सावरकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुण वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *