पुण्यामध्ये रांगोळी आणि नृत्य कलेचे सादरीकरण

महाराष्ट्र मध्ये भूअलंकरण दिवस निमित्त रांगोळी रेखाटनास मोठा प्रतिसाद

पुणे /तुळजापूर दि 22 प्रतिनिधी

22 एप्रील 2023 , देशभर भूअलंकरण दिवस म्हणून साजरा होत आहे . अ.भा.संयोजक संस्कार भारती भूअलंकरण रघुराज देशपांडे पुणे , यांनी तयार केलेले प्रारूप डिजाइन विविध ठिकाणी साकारले आले राष्ट्रीय स्तरावर भूअलंकारण दिवस अलीकडच्या काळात संस्कार भारतीच्या वतीने सर्व देशभर साजरा होत आहे आज या निमित्ताने मोठ्या संख्येने समिती स्तरावर रांगोळीचे रेखाटन रांगोळी विभागाच्या वतीने करण्यात आले.

.
पुण्या नजिक खड़कवासल्या येथे , झपूर्झा कलादालनात , भूअलंकरण दिवस ची रंगोली सजवण्यात आली . नृत्य गुरु शमाताई भाटे व सुचेता भिड़े तसेच रसिका गुमास्ते यांची भेट झाली . भूअलंकारण दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सुंदर रांगोळीचे रेखाटन करण्यात आले त्याचबरोबर नृत्य विभागाच्या कलावंतांनी याप्रसंगी शास्त्रीय नृत्य सादर केले रांगोळी आणि नृत्य कलेचा अनोखा निलाभ या कार्यक्रमात उपस्थित रसिक श्रोत्यांना अनुभवता आला. .झपूर्झा चे श्री गाडगील , सुनिल पाठक यानी , भूअलंकरण दिवस आणि अक्षय्य तृतीया निमित्त शुभकामना सहित उपस्थित सर्वांना धन्यवाद दिले .

देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये संस्कार भारती च्या वतीने राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भूअलंकारण दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने अखिल भारतीय भूअलंकारण विधाप्रमुख रघुराज देशपांडे यांनी या निमित्ताने आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला देशभरातील संस्कार भारती रांगोळी कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये संस्कार भारती समिती आणि रांगोळी कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *