देशभर संस्कार भारतीच्या वतीने जागतिक रांगोळी दिवस

संस्कार भारतीच्या वतीने 22 एप्रिल रोजी भूअलंकरण दिवस
भोपाल दि 20 डां. सतीश महामुनी

माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालयात , संस्कार भारती ची अखिल भारतीय प्रबंधकारिणी बैठक संपन्न झाली , जम्मू-कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पूर्वांचल सह देशभरातून आमंत्रित सदस्य उपस्थित होते .
9 एप्रील ला रघुराज देशपांडे (अ.भा. भूअलंकरण संयोजक) द्वारा – भूअलंकरण दिवस रंगोली प्रारूप डिजाइन निर्माण केले गेले . ही रंगोली , श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरा च्या खांबावरिल शिल्प कलेचे प्रारूप आहे – पाण्याच्या रंगावर , प्रतिकात्मक अडकवलेली घंटा व त्याचा घंटा नाद आपल्या ला जाग्रत व सावध करित असुन पाणी बचतीची सवय लावण्यास सुचवत आहे . ओंकारेश्वर नर्मदा नदी च्या तटावर वसलेले सुंदर मंदिर असुन , रंगोली पूर्ण करताना – अर्धवर्तुलात पांढरे बिंदुंची श्रृंखला, त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचे महत्व दर्शवत आहे .
रंगोली प्रारूप डिजाइन च अनावरण , वासुदेव कामत, अश्विन दलवी , अभिजीत गोखले, सतिष कुलकर्णी , रघुराज देशपांडे (पुणे) यांनी दीपप्रज्वलन करून केले .
22 एप्रील 2023 , सातवा भूअलंकरण दिवस असुन , देशभरातील विविध ठिकाणी तेथील रंगोली कलासाधक हे प्रारूप डिजाइन सजवणार आहेत. या साठी संस्कार भारती च्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *