पाच वर्षाची चिमुकली भुशेरा समीर शेख हिच्याकडून रमजान रोजा

पाच वर्षाच्या चिमुकलीने धरला रमजान रोजा, धाराशिव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रमजान सण

तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी

तुळजापूर येथील पाच वर्षाचे चिमुकली भुशेरा समीर शेख हिच्याकडून परंपरागत रोजा धरला असून लहान वयात तिने पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने रोजा धरल्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तुळजापूर येथील कमान वेस परिसरात राहणारी भुशेरा समीर शेख हिने दिनांक 17 एप्रिल रोजी मुस्लिम समाजात अत्यंत पवित्र मानला जाणारा रमजान सणाच्या निमित्ताने रोजा धरला तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी पुष्पहार घालून तिचे अभिनंदन केले कौतुक केले.

सर्व जगभर रमजान सणाच्या निमित्ताने समाजाकडून प्रार्थना केल्या जातात पाच वेळा नमाज पठण केले जाते पवित्र कोराड ग्रंथाचे वाचन करत जकात अदा करून अल्लाकडे संपूर्ण जगातील मानवी समाजाला सुखी समृद्ध करण्याची मनोकामना व्यक्त केली जाते असे मानले जाते की अल्ला कडून ही प्रार्थना मान्य केली जाते सर्व थोरा मोठ्या प्रमाणे लहान लहान चिमुकले देखील या पवित्र सणांमध्ये सहभागी होतात मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये या काळात रमजानचा रोजा पकडला जातो आणि सर्व धार्मिक विधी परंपरागत पद्धतीने साजरे केले जातात नातेवाईक आणि कुटुंबीय यांनी भुशेरा समीर शेख हिच्या या प्रयत्नाचे तोंड भरून कौतुक करताना गुलाब पुष्पाचा पुष्पहार तिला घातला आणि तिचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *