महाराष्ट्रातील सर्वात मोठी महा एनजीओ एनजीओ फेडरेशन

सोलापूर जिल्ह्यातील 90 संस्थांची उपस्थिती ,महाएनजीओ फेडरेशन कडून च्या आढावा बैठकीत

विविध सामाजिक प्रश्नांवर झाले विचार मंथन

सोलापूर दिनांक दहा प्रतिनिधी:  महा एनजीओ फेडरेशनच्या सोलापुरातील बैठकीत विविध सामाजिक प्रश्न व समस्या तसेच सामाजिक संस्थांच्या अडी अडचणींवर विचार मंथन झाले. पुढील काळात सामाजिक संस्थांसाठी विशेष कार्यशाळा आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी 90 हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सोलापूर मधील सामाजिक संस्थाची आढावा बैठक सोनी महाविद्यालय सैफुल येथे पार पडली.

या बैठकीला 90 पेक्षा जास्त सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वजिल्ह्यांमध्ये सामाजिक संस्थांची आढावा बैठक घेण्यात येत आहे. त्याची सुरुवात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या या बैठकीने रविवारी झाली. या बैठकी मध्ये दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख,महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक अमोल उंबरजे , गणेश बाकले, समन्वयक महेश कासट आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सामाजिक संस्थांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. पुढील काळात सामाजिक संस्थां साठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्या विषयावर आयोजित करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

प्रारंभी संचालक अमोल उंबरजे यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेतला. भूमिका स्पष्ट केली. 

त्यानंतर ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी महा एनजीओ फेडरेशन द्वारे सामाजिक संस्थांना कशाप्रकारे मदत करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. संचालक  गणेश बाकले यांनीसामाजिक संस्था एकत्रित येऊन कसे काम करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. सामाजिक संस्था चालविताना येणाऱ्या अडचणीवर विशेष चर्चासत्र झाले.आमदार  सुभाष  देशमुख यांनी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला. महा एनजीओ फेडरेशन द्वारे सोलापुरात शेखर मुंदडा यांच्या अध्यक्षते खाली एक कार्यालय स्थापन करून सोलापूर शहर व जिल्ह्यातील संस्थांना कशी मदत करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक संस्थांना येणाऱ्या अडचणी महा एनजीओ फेडरेशन द्वारे कश्या सोडवता येईल याबाबत चर्चा केली. समन्वयक महेश कासट व विजय जाधव यांनीसामाजिक संस्थेच्या वतीने आपले मत मांडले.

या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन मनोज देवकर यांनी केले. तर आभार विजय जाधव यांनी मानले.सोनी महाविद्यालयाच्या संचालिका वासंती अय्यर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *