अत्यंत प्रतिष्ठेचा लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराने कृष्णाई उळेकर झाली सन्मानित

युवा भारूडकार कृष्णाई प्रभाकर उळेकर लोकसत्ताच्या तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित
मुंबई
दिनांक 27 प्रतिनिधी

मुंबई ग्रँड सेंट्रल हॉटेल येथे लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात
ग्रामीण भागातील कलाकार कृष्णाई प्रभाकर उळेकर ला केंद्रीय रोजगार कामगार मंत्री भूपेंद्र यादव , महाराष्ट्र शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार. महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोंढा, एक्सप्रेस समूहाचे कार्यकारी संचालक श्रीमान गोयंका, सारस्वत बँकेचे गौतम ठाकूर, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सचिव प्रवीण दराडे, एमआयडीसीचे अभिजीत घोरपडे,महानिर्मितीचे संजय मारुडकर लोकसत्ता चे संपादक गिरीश कुबेर यांच्या शुभहस्ते कृष्णाईला सन्मानित करण्यात आले.

देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठी भाषेमध्ये भारुड सादर करणारी युवा भारूडकार कृष्णाई उळेकर ही तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील मूळ रहिवाशी असून शिक्षणाच्या निमित्ताने तिने पुणे येथील फरगुशन महाविद्यालयांमधून शिक्षण घेतले असून विद्यार्थी तसे पासून तिने भारुड ही लोककला प्रबोधनाच्या कामासाठी उपयोगात आणली आणि छोट्या वयापासून तिने या कलेमध्ये पारंगतता प्राप्त केली. समाजातल्या वेगवेगळ्या रूढी चालीरीती परंपरा यांच्यावर प्रबोधनात्मक भारुड करणारी कृष्णाई उळेकर ही महाराष्ट्रातली आघाडीची युवा भारूडकार आहे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील तसेच देशातील नामांकित व्यासपीठावर तिने भारुड ही लोककला सादर केली आहे तिच्या भारुड लोककलेच्या योगदानाबद्दल तिचा दैनिक लोकसत्ता च्या वतीने हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला आहे तिच्या या यशामध्ये तिचे वडील प्रभाकर उळेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण भागामधून या लोककलेच्या क्षेत्रामध्ये तिने प्रदीर्घकाळ काम करून जो लौकिक मराठवाड्याच्या भारुडाला निर्माण करून दिला आहे तो निश्चितच गौरवास्पद आहे वेगवेगळ्या कला संस्थांच्या व्यासपीठावर तिने अत्यंत प्रभावीपणे आपली भारुड कला सादर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *