जागतिक महिला जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत शिंदे प्रशालेची गार्गी कावरे प्रथम 

तुळजापूर दि 9 डॉ सतीश महामुनी

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर या विद्यालय  विद्यार्थिनी कु.गार्गी महेंद्र कावरे हिने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वैयक्तिक नृत्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

भारत सरकार नेहरू युवा केंद्र धाराशिव व नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशी महिला मंडळ च्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा उत्सव वैयक्तिक नृत्य खुला गटात कु. गार्गी महेंद्र कावरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

 माजी नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई गंगणे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक  धनंजय काळे, कल्याण सागर संस्थेचे सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, भाजपा नेते विकासराव कुलकर्णी , अध्यक्ष मीनाताई सोमाजी यांच्या हस्ते रोख रुपये २०००/- प्रमाणपत्र, चषक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री येलगोडे आर.बी, पर्यवेक्षक मा.श्री काशीद व्ही.पी.तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *