पंढरपुरात सुवर्ण श्री अशोकराव काटकर यांचा सत्कार, धाराशिव मध्ये अभिनंदनचा वर्षाव

Advertisements

तुळजापूर दिनांक 4 डॉ. सतीश महामुनी

जेष्ठ विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ वधूवर सुचक व तरूणांना लाजवेल असे कार्य करणारे, दुरद्रुष्टीकोन ठेवून लेखन करणारे लेखक सुवर्ण श्री.अशोकराव काटकर यांचा पंढरपुरात वधू-वर पालक परिषद मेळाव्यामध्ये सत्कार करण्यात आला.

पंढरपूर येथील राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळाव्यात सोनार समाज सेवा संस्था सोलापूर अध्यक्ष व पांचाळ सोनार समाज वधूवर सुचक संस्था महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष सन्मानीय श्री.पदनकुमार दिक्षित यांनी श्री अशोकराव काटकर (पंडित) यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.अशोकराव काटकर वधूवर सुचक उस्मानाबाद यांच्या लेखणीतून समाजातील बांधवाची जनजागृती करण्याचे कार्य ते अनेक वर्षापासून करीत आहेत त्यामुळे समाजाचे संघटन करण्यासाठी आपल्या भागात त्यांचे मोठे मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे स्वतःची पदरमोड करून समाजासाठी झटणाऱ्या अशोकराव काटकर यांचा पंढरपूर येथे झालेला सत्कार म्हणजे त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कामाची पावती आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो अशी बांधिलकी घेऊन आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विचारवंत अशोकराव काटकर सातत्याने काम करतात याचा आदर्श आपण सगळ्यांनी घेऊन त्यांना सहकार्य करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची तयारी ठेवली पाहिजे म्हणजेच त्यांचा पंढरपूर येथे झालेला सत्कार त्यांना अधिक पाठबळ देणारा वाटणार आहे याचा विचार आपण समाज बांधवांनी निश्चित करण्याची वेळ आलेली आहे विशेषता सोनार समाजाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपण सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे छोट्या छोट्या अडचणीच्या प्रसंगामध्ये आपण त्यांना सहकार्य केले तर त्यांचे मनोबल निश्चित वाढणार आहे आपण श्रीमंताच्या घरी म्हणा किंवा एखाद्या गर्भ श्रीमंताला सहकार्य करतो ते देखील केले पाहिजे समाजाची प्रगती करण्यासाठी सर्वच घटक पुढे आले पाहिजेत श्रीमंत आणि मातब्बर व्यक्तीला जशी आपण मदत करतो त्याच भावनेने गरिबातल्या गरीब सोनार समाज बांधवांना आपली मदत मिळाली पाहिजे जेव्हा हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजणार आहे तेव्हा अशोकराव काटकर सर यांचे काम अधिक सोपे होणार आहे हे देखील या सत्काराच्या निमित्ताने सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे जेव्हा एका व्यक्तीचा सत्कार होतो तेव्हा तो आपल्या सर्वांसाठी झटणाऱ्या व्यक्तीचा सत्कार आहे असे आपण मानले पाहिजे आणि त्यांच्या मदतीसाठी आपण वेळात वेळ काढून तसेच चार पैशाचा त्रास झाला तरी तो सहन करून आपण मदत केली पाहिजे हा संदेश या सत्काराच्या पाठीमागे आहे तो देखील आपण ओळखला पाहिजे.

श्री.अशोकराव काटकर शांतप्रिय व्यक्तीमत्व असणारे व सतत चांगल्या कार्याला शबासकी देणारे एक निस्वार्थी सुचक आहेत.समाजातील वधूवर यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून लवकरात लवकर विवाह जुळविण्याचे अथांग प्रयत्न सुरू असतात. या कामाची समाजाला खूप मोठी गरज आहे सोनार समाज हा सर्व गावांमध्ये अल्प प्रमाणात असल्यामुळे आपण बहुसंख्य होऊन प्रत्येक गावामध्ये वावरू लागलं तर त्याचा देखील सकारात्मक परिणाम इतर समाजावर होणार आहे आपल्या वेगवेगळ्या बैठका जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम जेथे समाज कमी आहे तेथे करण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे कमी संख्येने असणाऱ्या लोकांना निश्चित पाठबळ मिळेल आणि तेथील लोक निश्चित समाजाला काही ना काही देण्यासाठी पुढे येतील हा प्रयत्न झाला पाहिजे म्हणजे अधिक गावांमध्ये आपले काम उभे राहील आणि अशोकराव काटकर यांना देखील त्यामुळे काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल आपला समाज कलाकारांचा समाज आहे खूप मोठ्या संख्येने कलावंत आपल्यामध्ये आहेत कलाक्षेत्राच्या माध्यमातून आपण केवळ सोनार समाजाला नव्हे तर सर्वसाधारण समाज वर्तुळामध्ये आपण सुंदर कलात्मक कार्यक्रम सादर करू शकतो ज्याचा चांगला परिणाम तमाम समाजावर होणार आहे सोनार समाजाची कलावंत आणि कलाकारी ही खूप मोठी श्रीमंती आहे त्याचे दस्तान संवर्धन आपणच केले पाहिजे चित्रकार खूप मोठ्या संख्येने आपल्यामध्ये आहेत गायन करणारे कलावंत खूप आहेत वादन करणारे छोटे छोटे कलावंत आपल्यामध्ये आहेत चांगला लेखन कौशल्य तसेच चांगले हस्ताक्षर असणारी मंडळी आपल्यामध्ये आहेत या सर्वांचे संघटन आपल्या संघटनेच्या माध्यमातून झाले पाहिजे आणि त्यांना व्यासपीठ मिळवून दिले पाहिजे हे काम देखील समाजाला एकत्र करण्यासाठी खूप मोलाचे आहे जशी लाखो रुपये खर्च करून मंडप उभारल्यानंतर शंभर दोनशे रुपयांची रांगोळी त्या कार्यक्रमाची शोभा वाढवते त्याप्रमाणे आपण केलेला महत्त्व दिले पाहिजे आणि सोनार समाज हा कलाकारांची खान म्हणून समजला जातो म्हणून कलाक्षेत्राच्या माध्यमातून सोनार समाजाची व्यासपीठ केवळ सोनार समाजात नव्हे तर सर्वसाधारण समाजामध्ये प्रस्थापित झाले पाहिजे या दृष्टीने आपण सर्व बांधवांनी काम केले पाहिजे म्हणजे पंढरपूर येथे आपले जेष्ठ मार्गदर्शक अशोकराव काटकर यांचा झालेला सत्कार आपल्या समाजासाठी वरदान ठरणार आहे









Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *