शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बैठकीतील चर्चेचा इतिवृत्तांत त्रुटीमुळे आंदोलन चालू , परीक्षेचे गांभीर्य वाढले ?

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा पाठिंबा

तुळजापूर दि 20 प्रतिनिधी

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयामध्ये मंत्री महोदय अधिकारी वर्ग आणि संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेल्या निर्णयांचे इतिवृत्त समाधान हाती पडेपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा तुळजापूर तालुक्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अधीक्षक धनंजय पाटील, अधीक्षक पांडुरंग नागणे, शिक्षक सुनील कांबळे यांनी दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न शासनाने तातडीने सोडवावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

आश्वासित प्रगती योजना व जुनी पेन्शन योजना, ऑफलाईन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन प्रणाली मध्ये समावेश करावा या इतर मागण्या साठी उस्मानाबाद जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग जवाहर महाविद्यालय अनदुर मधुशाली महाविद्यालय सलगरा दिवटी तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर अंबामाता वरिष्ठ महाविद्यालय सलगरा दिवटी, या तुळजापूर तालुक्यातील विविध कॉलेजमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरात अधीक्षक धनंजय पाटील अधीक्षक पांडुरंग नागणे अधीक्षक सुमेरू कांबळे आणि इतर 35 शिक्षकेतर कर्मचारी यांनी ठिया आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांनी संघटनेला पाठिंबाची निवेदन दिले आणि मुंबई मंत्रालयात संघटनेच्या वतीने आजच हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयात दिले जाईल असे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या बाबत मंत्री महोदय संघटना प्रतिनिधी आणि मंत्रालयातील अधिकारी यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये जशी चर्चा झाली आहे त्याप्रमाणे तंतोतंत बैठकीचे इतिवृत्त संघटने कडे सुपूर्त करावे अशी मागणी शिक्षकेतर संघटना व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे मान्य कराव्यात अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *