शिवबा राजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी

तुळजापुरात शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथीं आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.

शिवबाराजे प्रतिष्ठान अध्यक्ष अर्जुनआप्पा साळुंखे, विवेक गंगणे श्रीकांत कदम सचिन ताकमोगे अनिल आगलावे यांच्यासह इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला शिवजयंतीच्या निमित्ताने शिवबा राजे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी शहरांमध्ये नागरिकांना आपल्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *