वीरशैव महिला हळदी कुंकवाला महिलांचा मोठा प्रतिसाद

वीरशैव महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम

तुळजापूर दि 19 प्रतिनिधी. तुळजापूर येथील वीरशैव लिंगायत महिला समितीच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली याप्रसंगी रेखाटलेली कुमारी साक्षी बेलुरे हिच्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

येथील वीरशैव लिंगायत  महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्री वीरतपस्वी भक्तनिवास येथे गुरुवारी संपन्न झाला .या कार्यक्रमास प्रतिसाद देत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.कु.साक्षी बेलुरे हिने काढलेले रांगोळीचे रेखाटन लक्षवेधक होती. या कार्यक्रमामध्ये शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या महिलांनी परस्परांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर येथे प्रतिवर्षी या समितीच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांचे स्नेहसंमेलन साजरी केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *